esakal | न्यायालय इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायालय इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल- दत्तात्रय भरणे

न्यायालय इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल- दत्तात्रय भरणे

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर: इंदापूर तालुका वकिल संघटना तसेच जेष्ठ वकिलांनी कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या इंदापूर न्यायालय बांधकामा संदर्भात ज्या सूचना केल्या आहेत, त्याचे निराकरण केले जाईल. वकिलांनी पक्षकारांसाठी शेडची मागणी केली असून, त्या शेडसाठी २० लाख रुपयांचा निधी दिला जाईल. असे आश्वासन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

हेही वाचा: Image Gallery: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात, नागरिकांची त्रेधातिरपट!

इंदापूर न्यायालयाच्या नुतन सुसज्जइमारतीची पाहणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकरयांनी केली. यावेळी वकील संघटना अध्यक्ष अॅड. प्रमोद खरात, उपाध्यक्ष अॅड.सचिन चौधरी, ग्रंथपाल अॅड. रविंद्र कोकरे, माजी अध्यक्ष अॅड. एन.जी शहा, अॅड.तेजसिंह पाटील, अॅड. एल.पी.शिंगाडे, अॅड.नितीन कदम यांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार जेष्ठ वकिल मनोहर चौधरी तर प्रदिप गारटकर यांचा सत्कार अॅड. धनंजय विंचू यांच्या हस्ते झाला.

मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, न्यायालय इमारतीचे बांधकाम दर्जेदार होत असून काम पुर्ण झाल्यानंतर इमारतीमुळे शहर सौंदर्यात भर पडणार आहे. यावेळी अॅड. पांडुरंग जगताप, अॅड. समिर तळेकर, अॅड. सचिन चौधरी, अॅड. महेश शिंदे, अॅड.कमलाकांत तोरणे, अॅड.रणजित चौधरी, अॅड.राजेंद्र सोमवंशी, अॅड.अवधूत डोंगरे, अॅड. किरण धापटे, अॅड. संदीप शिंदे, अॅड. सचिन राऊत, अॅड. अजिंक्य धारूरकर यांच्यासह बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

loading image
go to top