पुणे : बायको घ्यायची संशय; नवऱ्याने मागितला घटस्फोट अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

  • कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला पोटगीही नाकारली

पुणे : क्रूरतेच्या मुद्‌द्‌यावर पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून पतीने दाखल केलेला पतीचा दावा येथील कौटुंबिक न्यायालयाने मान्य करीत दोघांना घटस्फोट दिला. तसेच पत्नीने पोटगीबाबत दाखल केलेले दोन अर्ज व स्त्रीधन मिळण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संदीप आणि पूजा (नावे बदललेली) हे दोघेही नोकरदार. 1996 मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात वाद होऊ लागले. आजारपणामुळे पती ऍडमिट असताना त्याचे तेथील नर्सशी अनैतिक संबंध निर्माण झाले, असा पूजाला संशय होता. त्यातून त्यांच्यात आणखी वाद निर्माण झाले. त्यानंतर पूजाने तीन वेळा संदीप याच्या विरोधात तक्रार दिली होती. 2012 मध्ये पूजाने पतीविरोधात फिर्याददेखील दाखल केली होती. त्यात सासू आणि नणंदेने त्रास दिल्याचे म्हटले होते. पत्नीकडून होत असलेल्या या त्रासामुळे संदीपने क्रूरतेच्या मुद्‌द्‌यावर घटस्फोट मिळावा, असा दावा 2014 मध्ये दाखल केला होता. त्यानंतर पूजानेदेखील वेगवेगळ्या नियमांप्रमाणे पोटगीचे दोन अर्ज दाखल केले. पूजाला संदीपबरोबर राहायचे नाही. तिला केवळ संदीपला त्रास द्यायचा आहे. त्यामुळे तिने पतीविरोधात तक्रार अर्ज दिले आहेत. त्या दाव्यांचा अद्याप निकाल लागलेला नाही.

शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?

पुण्यात असलेले चार फ्लॅटही पूजाने ताब्यात घेतले आहेत, असे ऍड. रोहन कापरे व ऍड. रोनक व्हनकळस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजूंचा विचार करीत पतीचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला. तसेच पूजाने स्त्रीधन आणि पोटगीसाठी केलेले अर्ज फेटाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court grants divorce to man who molestation from wife

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: