court
sakal
पुणे - पत्नीला पोटगी द्यायला लागू नये म्हणून न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर प्राप्तिकराचा परतावा शून्य दाखवीत प्रतिज्ञापत्राबरोबर बँक खात्याचे स्टेटमेंट जोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला. उत्पन्न लपविल्याचा ठपका ठेवत पत्नीला दरमहा दहा हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी दिला.