Jain Boarding Trust issue
Esakal
पुणे
Jain Boarding Issue : जैन बोर्डिंगचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्यावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या तीन एकर जागेच्या विक्रीचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याचा आदेश दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी (ता. १४) दिला.
पुणे - मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या तीन एकर जागेच्या विक्रीचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याचा आदेश दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी (ता. १४) दिला. यामुळे ट्रस्ट आणि विकसक गोखले लँडमार्क्स एलएलपी यांच्यातील जमीन खरेदी दस्त कायदेशीरदृष्ट्या रद्दबातल झाला आहे.

