
पुणे/वाघोली - जमिनीच्या वादातून एकाने चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना केसनंद भागातील वाडे बोल्हाई रस्त्यावर गुरुवारी रात्री घडली. गोळी पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.