पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय

covid 19 good sleep must needed do's and don'ts
covid 19 good sleep must needed do's and don'ts

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात आपल्या रोजच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहे. लॉकडाउनच्या काळात बदललेले जीवनचक्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या, त्या अनुषंगाने तयार झालेले चिंताग्रस्त वातावरण, वर्क फ्रॉम होम, असे एक ना अनेक बदल आपले मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहे. त्यामुळे रोजची झोप पुरेशा प्रमाणात घेणे, आता आवश्यक झाल्याचे डॉक्टर सांगतात. जागतिक झोप दिनानिमित्त डॉक्टरांशी संवाद साधले असता त्यांनी हे निरिक्षण नोंदविले. मानसिक ताणतणावात झोपेचे चक्र बिघडल्यास त्याचा रोजच्या व्यवहारांवर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अशा साथीच्या काळात तर शांत झोपेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. नागरिकांनी दुपारची झोप टाळून, रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

झोपेचे गणित

  1. अठरा ते ६५ वयोगटातील व्यक्तीने सात ते नऊ तास झोप घेणे आवश्यक
  2. कमी झोप झाल्यास रोजचे व्यवहार प्रभावित होतात, कामावर लक्ष लागत नाही
  3. दिवसा झोप घेणे आरोग्यास घातक

शांत झोपेसाठी

हे करा...

  1. झोपण्याची वेळ आणि ठिकाण एकच असावी
  2. झोपण्यापूर्वी पुस्तके वाचणे चांगले
  3. योग्य व्यायाम व आहार घ्या
  4. झोपण्याचे जागा अति थंड किंवा उष्ण नसावी
  5. दिवे बंद असलेले, शांत ठिकाण झोपेसाठी कधीही चांगले

हे करू नका

  1. रात्री उशिरापर्यंत विनाकारण जागणे
  2. मोबाईलचा झोपेपर्यंत वापर
  3. उत्तेजक प्येय आणि व्यसन करणे
  4. मोबाईल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक गॅझेट झोपताना जवळ बाळगणे
  5. अति जेवण, कॉफी, चहा आदी घेवू नये
  6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या


कोरोनामुळे झोपेबरोबरच मनःशांती हरवली आहे. योग्य आहार, व्यायामाबरोबच झोपेचीही नितांत गरज आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती शाबूत राहते. योग्य वेळी योग्य झोप घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखा

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com