esakal | पुणे : भिगवणमध्ये कोरोनाची साखळी तुटता तुटेना...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

भिगवण स्टेशन येथे 15 दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर येथील कोरोनाची साखळी सुरुच राहिली आहे.

पुणे : भिगवणमध्ये कोरोनाची साखळी तुटता तुटेना...

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : भिगवण स्टेशन येथे 15 दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर येथील कोरोनाची साखळी सुरुच राहिली आहे. भिगवण स्टेशन येथील महिलेनंतर सलून व्यावसायिक, थोरातनगर येथील व्यावसायिक व आता तर महिला डॉक्टर व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवणचा धोका वाढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भिगवण येथे २८ एप्रिलला पहिला कोरोना रुग्ण आढळला. परंतु रुग्णांच्या मृत्यूनंतर व संपर्कातील नातेवाईकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे कोरोनाची साखळी तुटली होती. त्यानंतर अडीच महिने भिगवणकरांनी कोरोनाला रोखून धरले होते. परंतु त्यानंतर ८ जुलैला पुन्हा भिगवण स्टेशन येथील एका ४० वर्षीय महिलेला कोरोना लागण झाली होती. ही साखळी तोडण्यासाठी भिगवणकरांनी मोठा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर सदर महिलेच्या संपर्कातील चार, तसेच भिगवण स्टेशन येथील सलून व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. सलुन व्यवसायिकांच्या संपर्कातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सलून व्यावसायिकानंतर येथील थोरातनगर येथील एक व्यावसायिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु त्यांच्या संपर्कातील ३८ व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भिगवणमधील कोरोना साखळी तुटण्याची शक्यता वाटत असतानाच येथील महिला डॉक्टर व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे भिगवणकरांचा धोका वाढला आहे. महिला डॉक्टर व त्यांचा मुलगा यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांची बारामती येथे शनिवारी (ता.२५) कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांना धक्का बसला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, सबंधित महिला डॉक्टरांच्या संपर्कातील ५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल प्रतिक्षेत आहे. इंदापुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी भिगवणला भेट देऊन आढावा घेतला. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या प्रभाग क्रमांक एकचा काही भाग सील करण्यात आला आहे.