esakal | पुण्यात आज लसीकरण बंद; लशी आहेत पण सुया नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

बुधवारी अनेक लसीकरण केंद्रांवर सीरिंज नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला होता.

पुणे : लशी आहेत पण सुया नाहीत; आज लसीकरण बंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध न झाल्यामुळे अनेकदा लसीकरणाला ब्रेक देण्याची वेळ पूर्वी महापालिकेवर आली. आता मात्र लस उपलब्ध आहे, पण लशीचा डोस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सीरिंजचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुवारी लसीकरण होणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून लशीचा पुरवठा सुरळीत होत आहे. मात्र लस देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सीरिंजची उपलब्धता ही अडचण ठरू लागली आहे. बुधवारी अनेक लसीकरण केंद्रांवर सीरिंज नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला होता. लसीकरणासाठी डोस आल्यानंतर त्याच्या सोबत सीरिंजही पाठविल्या जातात. हाताळणीत सीरिंज खराब होण्याची शक्यता गृहीत धरून सीरिंज दहा टक्के अधिक संख्येने पाठविल्या जातात. महापालिकेला सध्या प्रतिदिन ५० हजार सीरिंजची गरज आहे. सध्या केवळ दहा हजार सीरिंजच उपलब्ध आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात दिवसात ६५६ नवे कोरोना रुग्ण

लसीकरणासाठी आवश्‍यक सीरिंजची कमतरता असली तरी, लसीकरणाच्या कामावर बुधवारी काही परिणाम झालेला नाही. महापालिका स्वखर्चानेदेखील सीरिंज विकत घेण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी निविदा काढावी लागेल. राज्य सरकारकडेही सीरिंजची मागणी करण्यात आली आहे. - रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

loading image
go to top