esakal | पुणे जिल्ह्यात दिवसात ६५६ नवे कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

पुणे जिल्ह्यात दिवसात ६५६ नवे कोरोना रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.२९) दिवसभरात ६५६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसांत नवीन रुग्णांइतकेच कोरोनामुक्त झाले असून अन्य सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील १८९ जण आहेत.

हेही वाचा: शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत पिंपरी चिंचवडमधील ११३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २९२, नगरपालिका हद्दीतील ५६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जण आहेत.

हेही वाचा: IPL 2021 : मॅक्सवेलची फिफ्टी, RCB प्ले ऑफपासून एक पाउल दूर

दिवसात शहरातील १४१, पिंपरी चिंचवडमधील ७८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६४, नगरपालिका हद्दीतील ६० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण सहा हजार २९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामध्ये शहरातील १ हजार ४४२ जण आहेत.

loading image
go to top