Covid 19 Vaccination - पुण्यातील लसीकरणाबाबत सकारात्मक बातमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रथमच शहरात एका दिवसातील उच्चांकी लसीकरण झाले. लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (ता. १६) शहरात ५५ टक्के लसीकरण झाले होते. तर आज त्यात वाढ होत ते ६३ टक्के झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिवसभरात अपेक्षित ८०० लाभार्थ्यांपैकी ५०२ लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली.

पुणे - कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रथमच शहरात एका दिवसातील उच्चांकी लसीकरण झाले. लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (ता. १६) शहरात ५५ टक्के लसीकरण झाले होते. तर आज त्यात वाढ होत ते ६३ टक्के झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिवसभरात अपेक्षित ८०० लाभार्थ्यांपैकी ५०२ लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लसीकरणाच्या पहिल्याच दिवसापासून कोविन ॲप मधील बिघाडामुळे लाभार्थ्यांसह केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पर्यायाने लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याचे अधिकारी सांगत होते. गेली आठवडाभर ॲपमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्यात आले. तसेच महापालिकेच्या वतीने केंद्रांची संख्या वाढविणे, ॲपच्या वापरासंबंधी केलेले बदल, लसीकरणासंबंधी केलेले आवाहन आदींचा सकारात्मक परिणाम आजच्या लसीकरणावर पाहायला मिळाला आहे.

पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक

शनिवारचे लसीकरण -
पुणे ग्रामिण :  ६२ टक्के
पुणे शहर : ६३ टक्के
पिंपरी-चिंचवड शहर : ५२ टक्के
पुणे सर्कल (पुणे, सातारा, सोलापूर) : ७२.७ टक्के
कोथरूड येथील जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल आणि रुबी हॉल येथे शंभर टक्के लसीकरण झाले. तर सर्वात कमी ससून हॉस्पिटल येथे २९ टक्के लसीकरण झाले. जिल्ह्यात आज सरासरी ६० टक्के लसीकरण झाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 vaccination program cowin app pune positive response