पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक

टीम ई सकाळ
Saturday, 23 January 2021

रामटेकडी येथील महापालिकेच्या आदर्श कन्सट्रकशन कचरा प्रकिया प्रकल्पाला शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

हडपसर - रामटेकडी येथील महापालिकेच्या आदर्श कन्सट्रकशन कचरा प्रकिया प्रकल्पाला शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत कचरा प्रक्रीया मशनरी देखील जळून खाक झाली. घटनास्थळी आग्नीशामक दलाच्या पाच गाडयांच्या सहाय्याने रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण अदयाप स्पष्ट झालेले नाही.

रामटेकडी येथील स्मशानभूमीजवळ हा 75 मेट्रीक टनाचा हा प्रकल्प आहे. याठिकाणी कच-यावर प्रकीया करून आरडीएफ आणी कंपोस्ट खत तयार केले जाते. अचानक कचरा प्रकीया प्रकल्पाला आग लागली. त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना व आग्नीशामक दलाला याबाबतची माहिती दिली. तातडीने आग विझविण्याचे बंब घटनस्थळी दाखल झाले. मात्र प्रकल्पात बंब जाण्यासाठी अरूंद रस्ता होता. त्यामुळे आग विझविताना कर्मचा-यांना मर्यादा येत होत्या. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हडपसर औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प आहे. धुराचे लोळ औद्योगिक वसाहतीत पसरले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. 
पुणे पुणे पुणे पुणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hadapsar fire waste process project machine burn