esakal | कोरोना लस सुरक्षित; पण इफेक्ट किती दिवस राहणार?

बोलून बातमी शोधा

covid 19 vaccine safe expert opinion}

एका वर्षात कोरोनावरील लस निर्माण करणे आणि ती बाजारात आणणे आश्चर्यकारक नसले तरीही उल्लेखनीय कार्य आहे.

कोरोना लस सुरक्षित; पण इफेक्ट किती दिवस राहणार?
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : सध्या परवानगी देण्यात आलेल्या सर्वच कोरोना लशींचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र लस घेतल्यानंतर निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती किती काळ टिकते, याबद्दल आपल्याला आत्ताच काही सांगता येणार नाही, असे मत रोगप्रतिकार तज्ज्ञ डॉ. विनीता बाळ यांनी व्यक्त केले. विज्ञान दिनानिमित्त आयसरच्या वतीने दिवसभर विविध ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका व्याख्यानात डॉ. बाळ बोलत होत्या. एका वर्षात कोरोनावरील लस निर्माण करणे आणि ती बाजारात आणणे आश्चर्यकारक नसले तरीही उल्लेखनीय कार्य आहे. साधारणपणे पाच ते १० वर्षांचा कालावधी लसीला बाजारात आणण्यासाठी जातो. पण, साथीच्या काळात अत्यंत तातडीने लस बाजारात आणणे गरजेचे होते, असे डॉ. बाळ यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लसीबद्दल डॉ. बाळ म्हणाल्या

  • लसीचे मोठ्या प्रमाणावर साइड इफेक्ट’नाही
  • साधारण ताप येणे, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे आदी प्रकार दिसू शकतात.
  • शक्य होईल त्याने कोणतीही लस घ्यावी.
  • गंभीर आजाराची स्थिती असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • लसीची पहिली मात्र रोगप्रतिकारशक्तीला निर्माण करते, तर दूसरी मात्रा तिला बूस्टर देते
  • ब्रिटन, द.आफ्रिका, ब्राझील येथील नव्या स्ट्रेनसाठी लस उपयुक्त दिसत आहे.
  • विषाणूमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युटेशन झाल्यावर निश्चितच बदल
  • करावे लागतील
  • कोरोना होऊन गेल्यानंतरही लशीची एक मात्रा घेतली तरी चालते.