
पुणे : राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. ही बाब दिलासादायक ठरत आहे. आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात राज्यात नोंदवण्यात आलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.