Covid JN1 : कोविडच्या जेएन.वन विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

केरळ पाठोपाठ सिंधुदुर्ग येथे कोविडच्या जेएन.वन या विषाणूची लागण झालेला रूग्ण आढळल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा झाली सतर्क.
 Corona JN1 Virus
Corona JN1 Virusesakal

पुणे - केरळ पाठोपाठ सिंधुदुर्ग येथे कोविडच्या जेएन.वन या विषाणूची लागण झालेला रूग्ण आढळल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून दवाखान्यांमध्ये संशयित रुग्णांची माहिती घेऊन चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच मॉक ड्रील घेऊन आरोग्य यंत्रणेची सक्षमता ही तपासण्यात आलेली आहे.

नागरीकांनी घाबरून जाऊ नये, मात्र नियमीत व स्वच्छ हात धुणे, मास्कचा वापर करण्यावर भर देण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

केरळ येथे कोविडच्या जेएन.वन विषाणूचे रूग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रातील सिंधूदुर्ग येथेही जेएन.वन विषाणूची बाधा झालेला रूग्ण आढळला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आरोग्य यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. त्यामध्ये कोविडच्या जेएन.वन विषाणुच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहरात कोविड सक्रिय रुग्णांची संख्या सात असून दर आठवड्याला दिडशे चाचण्या केल्या जात आहेत. एका रूग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. दरम्यान, शहरातील सर्व दवाखान्यांमध्ये संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दवाखान्यात येणाऱ्या संशयित रूग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेणे, त्यांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकतीच "मॉक ड्रील' घेतली आहे, त्यामध्ये उपलब्ध खाटा, आयसीयू सुविधा, ऑक्सिजन,औषधसाठा, मनुष्यबळ यांचा आढावा घेण्यात आला असल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले.

'शहरात कोरोनाच्या जेएन.वन विषाणू संक्रमित एकही रूग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगून योग्य उपाययोजना करण्यात येत आहे. नुकताच मॉक ड्रील घेण्यात आला असून त्यामध्ये आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये, आवश्‍यक काळजी जरूर घ्यावी.

- डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका.

महापालिकेकडे उपलब्ध वैद्यकीय सुविधा

- आयसोलेशन बेड - ६२०

- ऑक्सिजन बेड - ६७४

- आयसीयू बेड - ३९६

- व्हेंटिलेटर बेड - ४१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com