
देहू : देहू नगरपंचायतीच्या हद्दीत विठ्ठलवाडीत एक कोरोना सदृश रुग्ण आढळल्याची माहिती देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली. परिसरातील नागरिकांना खबरदारी घ्यावी. काही आजार असल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन मोफत उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. किशोर यादव यांनी केले आहे