
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत २७४५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले असून, त्यापैकी ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व २६७० रुग्ण बरे झाले आहेत. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे, तर सध्या केवळ ३२ रुग्ण उपचाराधीन आहेत.