esakal | . पुणे : 115 केंद्रावर लसीकरण, येेथे मिळणार कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield Covaxin

पुणे : 115 केंद्रावर लसीकरण, येेथे मिळणार कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सरकारकडून महापालिकेला कोव्हिशील्डचे १९ हजार तर कोव्हॅक्सीनचे २ हजार ३०० डोस प्राप्त झाले असून, उद्या (बुधवारी) शहरातील १०१ केंद्रांवर कोव्हिशील्डचे लसीकरण केले जाईल तर १४ ठिकाणी कोव्हॅक्सीन लस ही केवळ दुसऱ्या डोससाठी वापरली जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान आज (मंगळवारी) खासगी केंद्रावर ४ हजार ८५५ जणांचे लसीकरण झाले. (Covishield at 101 centers and covaxin at 14 places available in Pune today)

महापालिकेडील लस संपलेली असल्याने मंगळवारी शहरातील लसीकरण केंद्र बंद होती. पण आता लस उपलब्ध झाल्याने पुढील किमान दोन दिवस तरी महापालिकेच्या केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी लसीकरण केंद्रांवरील राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी नियमावली तयार केली असली तरी आता थेट नगरसेवकांचे नाव समोर ठेऊनच केंद्र निश्‍चीत केले जात आहेत. त्यासाठी नगरसेवकांनी सुचविलेल्या केंद्रांच्या याद्या आरोग्य विभागाकडे पाठविल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेला दुपारी लस मिळून देखील कोणत्या केंद्रांवर लस द्यायची व कोठे नाही याचे हे ठरविण्यासाठी रात्री उशीर होत असल्याचे असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ६२ टक्के नागरिक लशीविना

हे लक्षात ठेवा

- कोव्हिशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांपूर्वी (२ मार्च ) घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळेल

- दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस उपलब्ध

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी ६० टक्के डोस उपलब्ध

- ऑनलाइन बुकिंग सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल

- पहिल्या डोससाठी थेट लसीकरण केंद्रांवर जाणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के डोस राखीव

- कोव्हॅक्सीनची लस प्राधान्याने दुसऱ्या डोससाठी दिली जाणार

- ११५ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस देण्यात आले आहेत