स्वत- तयार करा ब्लू-टूथ कंट्रोल रोबो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पुणे - दिवाळीच्या सुटीत आपल्या रोजच्या वापरातील टेक्‍नॉलॉजीबाबत माहिती करून देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ व ‘टेक्‍नो स्किल्स’तर्फे दोनदिवसीय रोबोटिक्‍स कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

पुणे - दिवाळीच्या सुटीत आपल्या रोजच्या वापरातील टेक्‍नॉलॉजीबाबत माहिती करून देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ व ‘टेक्‍नो स्किल्स’तर्फे दोनदिवसीय रोबोटिक्‍स कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स गाड्या, रिमोट सेंसरवर चालणारी खेळणी, घरातील वस्तू यांचे मुलांना नेहमीच आकर्षण असते, अशी खेळणी खेळण्यापेक्षा ती चालते कशी, आतमध्ये काय आहे, याबाबत त्यांना जास्त कुतूहल असते. याच कुतूहलाचे जर शिक्षणात रूपांतर केले तर मुलांची आकलनक्षमता वाढीस लागते. मनोरंजनातून शिक्षण अशा पद्धतीने हे वर्कशॉप तयार केले आहे. या कार्यशाळेत मुलांना रोबोटिक्‍स कार तयार करायची आहे. यात सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

ब्लू-टूथ कंट्रोल रोबोटिक्‍स कार्यशाळा 
 कोठे - सकाळ, बुधवार पेठ कार्यालय, पुणे
 कधी - शनिवार (ता. १७) व रविवार (ता. १८) 
 केव्हा - सकाळी ११ ते दुपारी ४ 
 वयोमर्यादा - १२ ते २३ वर्षे
 सर्व साहित्यांसह शुल्क - २५०० रुपये 
(ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा)
 अधिक माहितीसाठी संपर्क - ८८०५००९३९५, ९५५२५३३७१३

 पहिला दिवस - स्वत- अँड्रॉइड ॲप तयार करणे, प्रोग्रॅमिंग, ब्लू-टूथची माहिती
 दुसरा दिवस - तयार केलेल्या ॲपद्वारे वायरलेस ब्लू-टूथ रोबोची जोडणी करणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Create your own Blue-tooth control robo