श्रेयवादावरून उंब्रजला जुन्नरच्या आजी-माजी आमदारांत जुंपली | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Benake and Sharad Sonawane
श्रेयवादावरून उंब्रजला जुन्नरच्या आजी-माजी आमदारांत जुंपली

श्रेयवादावरून उंब्रजला जुन्नरच्या आजी-माजी आमदारांत जुंपली

जुन्नर - उंब्रज नंबर दोन ता. जुन्नर येथील कार्यक्रमात आमदार अतुल बेनके (Atul Benake) व माजी आमदार शरद सोनवणे (MLA Sharad Sonawane) यांच्यात श्रेयवादावरून चांगलीच जुंपली.

रस्त्याच्या भुमीपुजनाच्या प्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनकें यांच्यात शाब्दीक चकमक उडाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक ग्रामस्थ हा प्रकार पाहून काही काळ अचंबित झाले.

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या मध्यस्थीनंतर आजी माजींच्या वादावर पडदा पडला आणि दांगट, सोनवणे व बेनके या तिघांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.

हेही वाचा: पुणे : शाळा बंदच्या निर्णयात झाली घाई

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील उंब्रज येथील पुतळादेवी ते शेवाळपाईन रस्त्याचे काम आपल्या काळात मंजूर झाले असताना विद्यमान आमदार अतुल बेनके मात्र त्याचे उदघाटन करून श्रेय घेत असल्याचे पाहून सोनवणे आपल्या कार्यकर्त्यांसह येथे हजर झाले आणि वादाला तोंड फुटले.जुन्या कामांची वर्क ऑर्डर झाली नाही नवीन सरकार आल्यानंतर ही कामे रद्द झाली. मला राग असता तर हा रस्ता अन्यत्र घेऊ शकलो असतो मात्र ग्रामस्थांनी मागणी केल्याने या कामासाठी मंजुरी घेऊन वर्क ऑर्डर घेतली असल्याचे बेनके यांनी यावेळी सांगितले. तर योजनेतील जुनी कामे रद्द झाली नाहीत की बदलली देखील नाहीत. मी जिल्ह्यातील सर्व आमदारांकडे चौकशी केली आहे माझेकडे पुरावे आहेत मी दुसऱ्याच्या कामावर हक्क सांगत नाही असे सोनवणे यांनी सांगितले.

या वादात माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी मध्यस्थी करताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे याची जाणीव करून देत. माजी आमदार वल्लभ बेनके यांनी बेल्हे प्रादेशिक नळ पाणी योजनेचे काम मंजुर केले होते त्यात मी काही सुधारणा सुचविल्या व त्या कामाच्या भूमीपूजनाला शशिकांत सुतार यांना आणले होते तर उंब्रज सबस्टेशनचे काम मी आमदार असताना केले होते त्यावेळी त्याच्या उद्घाटनाला अजित पवार आले असताना मी त्यांना विरोध केला नाही हे सांगितले. विकासकामांत आम्ही एकमेकांना कधी विरोध केला नाही.आज राज्यात आघाडीचे सरकार असताना आपण सगळ्यांनी बरोबर उभे राहिले पाहिजे असे सांगून दांगट यांनी बेनके व सोनवणे यांच्यातील वादावर पडदा टाकला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top