महाराष्ट्रातील उद्योगांना राष्ट्रीयकृत बॅंकांनी वाटप करताना फक्त एवढाच केला पत पुरवठा; वाचा सविस्तर

मंगेश कोळपकर 
गुरुवार, 9 जुलै 2020

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी, त्यातील एक लाख १४  हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या पदरी फक्त सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयेच पडले आहेत. राज्यात १५ लाखांपेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक असताना, फक्त एक लाख जणांना त्याचा थेट फायदा झाला आहे.

पुणे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी, त्यातील एक लाख १४  हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या पदरी फक्त सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयेच पडले आहेत. राज्यात १५ लाखांपेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक असताना, फक्त एक लाख जणांना त्याचा थेट फायदा झाला आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात सर्वाधिक सूक्ष्म, लघु आणि मध्म उद्योग असलेल्या राज्यांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातून राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) सुमारे १६ टक्क्यांची भर पडत असताना, राष्ट्रीयकृत बॅंकांनी ६५ हजार कोटी रुपयांचे वाटप करताना महाराष्ट्रातील या उद्योगांना फक्त सुमारे १० टक्केच पत पुरवठा केला आहे. उर्वरित पतपुरवठा खासगी बॅंकांनी केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमधून हा प्रकार उघड झाला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांची आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची काही प्रमाणात उदासीनता त्याला कारणीभूत ठरत आहे. या उद्योगांनी घेतलेल्या कर्जाच्या २० टक्के आणखी रक्कम त्यांनी मागणी केल्यावर विना कागदपत्रे दोन दिवसांत देण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यानुसार कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले आहे. 

ॲम्बुलन्ससाठी होणारी लूट थांबणार; नवे दर काय आहेत ते जाणून घ्या!

सहकारी बँकांसाठीही योजना हवी
राज्यातील अनेक उद्योगांची सहकारी बॅंकांत खाती आहेत. सहकारी बॅंकांना ही योजना लागू नसल्यामुळेही त्यांची कुचुंबना झाली आहे, त्यामुळे ही योजना सहकारी बॅंकांनाही लागू करावी, अशी मागणी पुण्यातील उद्योजक अरुण माने यांनी केली आहे. 

केंद्र सरकारच्या योजनेनुसार उद्योगांना वित्त पुरवठा करून देण्यात येत आहे. त्यांनी काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांना वाढीव रक्कम देण्यात येते. त्याची पूर्तता त्यांनी केल्यावर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ही योजना उद्योगांपर्यंत पोचविण्यासाठी स्टेट बॅंक प्रयत्नशील आहे. 
- अभय पाटील, एमएसएमई विभागाचे झोनल मॅनेजर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया

पुण्यात घर घ्यायचंय? तर ही बातमी नक्की वाचा!  

देशाच्या विकासासाठी उद्योगांची वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारची वाढीव पतपुरवठा देण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. या बाबत उद्योगांना माहिती व्हावी, यासाठी एमसीसीआयएतर्फे राष्ट्रीयकृत बॅंकांच्या मदतीने ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करून उद्योजकांना माहिती देऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- प्रशांत गिरबने (महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर)

महाराष्ट्रात झालेला वित्त पुरवठा (४ जुलैपर्यंत) 

  • २,६८,९०९ - कंपन्यांची प्रकरणे मंजूर   
  • १,०३,३२४ - प्रत्यक्ष पैसे मिळालेले   
  • ६,८५६.५३ कोटी - रक्कम मंजूर  
  • ३,६०५.६१ कोटी - रक्कम वितरीत  
  • ६.३३ कोटी - देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या   
  • १५,२५,२१० - महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: credit supply provided by the nationalized banks to the industries in Maharashtra