esakal | धनगर समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल बारामतीत तिघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानानंतर सोशल मिडीयावर अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यापैकी काही पोस्टमुळे  

धनगर समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल बारामतीत तिघांवर गुन्हा

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : धनगर समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आज बारामती येथील तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. 

या संदर्भात अभिजीत अरविंद देवकाते (रा. नीरावागज, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. सोशल मिडीयावर धनगर समाजाविरुध्द धार्मिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रदीप खोब्रागडे, दीपक जाधव व सोपान धुमाळ या तिघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कोरोनाच्या धास्तीमुळे पुण्याबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानानंतर सोशल मिडीयावर अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यापैकी काही पोस्टमुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. बारामतीत धनगर समाज बांधवांनी काल पोलिसांत याबाबत अर्ज दिला होता. मात्र, काल पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी कालच्या घटनेची गंभीर दखल घेत बारामती शहर पोलिस ठाण्याऐवजी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची सूचना धनगर बांधवांना केली होती. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यास नकार देत दमदाटी केल्याची तक्रार धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर आज स्वतः शिरगावकर यांनी शहर पोलिस ठाण्यात येत हा गुन्हा तालुका पोलिसात दाखल करायला लावला.