

High-Stakes Arrest: Fugitive Wanted Under MCOCA Apprehended in Kothrud
sakal
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-तीनच्या पथकाने कोथरूड परिसरातून अटक केली. अभिजित उत्तम गोरडे (वय ३३, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, अशिष गार्डनजवळ, कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.