
CCTV footage shows thieves breaking into a locked house in Warulwadi and looting Rs 5 lakh worth of valuables.
Sakal
-रवींद्र पाटे
नारायणगाव : वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या दोन सोसायटीमधील तीन बंद फ्लॅट आज्ञात चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास फोडले. यापैकी एका बंद फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधील कपाटात ठेवलेले 47 ग्रॅम सोन्याचे दागिने, वीस हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीची ही घटना आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.