

₹2 Lakh Stolen from Temple Donation Box in Kothrud
Sakal
कर्वेनगर : उजवी भुसारी कॉलनी येथील संकल्प सिद्धी हनुमान मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेला पोलिसांच्या गस्त व्यवस्थेचे अपयश जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिकांसह भाविकांचे म्हणणे आहे. स्थानिक रहिवासी मुरलीधर मानकर आणि नीलेश सौंदणे म्हणाले की, ‘चोरीच्या घटनेनंतर मंदिर व्यवस्थापनाने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली आहे.