भिमाशंकर अभयारण्यामध्ये भेकर जातीचे वन्यप्राणी मारल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news case registered against 3 persons for killing wild animals Bhimashankar Sanctuary pune
भिमाशंकर अभयारण्यामध्ये भेकर जातीचे वन्यप्राणी मारल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल

भिमाशंकर अभयारण्यामध्ये भेकर जातीचे वन्यप्राणी मारल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल

घोडेगाव : आरोपीने वन्य प्राणी मारल्यानंतर फोटो सोशल मीडियावर टाकले याची त्वरित दखल घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. भिमाशंकर अभयारण्यामध्ये भेकर जातीचे वन्यप्राणी मारल्याप्रकरणी तीन जणांवर वन्यजीव संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जणांस ताब्यात घेण्यात आले असून, दोन जण फरार असल्याचे भिमाशंकर अभयारण्य -१ वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले.

रामा शांताराम कोकरे (रा. भीमाशंकर ता. खेड) याने भेकर जातीचे वन्यप्राणी मारल्यानंतर संबंधित फोटो सोशल मिडियावर टाकले. याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी यांना कळतांच त्यांनी रामा कोकरे यांस ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता अजुन दोन जण असल्याचे सांगितले. सदर प्रकरणी वन्यजीव संरक्षण वन अधिनियमा अन्वये संबंधित व्यक्तिंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या दोन जणांचा शोध घेणे चालू आहे. संबंधित कारवाई वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्षनाखाली सहायक वनसंरक्षक अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण पुढील तपास करत आहे.

भिमाशंकर अभयारण्यामध्ये कोणत्याही व्यक्तिने अभयारण्यातील प्राण्यांना इजा केलेली अथवा मारल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर त्वरीत वन्यजीव संरक्षण वनअधिनिया अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच याबाबत कोठेही अशी घटना घडलेली नागरिकांस लक्षात आले तर त्यांनी त्वरीत वनपरिक्षेत्र कार्यालय भीमाशंकर येथे संपर्क साधावा. खबर देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Crime News Case Registered Against 3 Persons For Killing Wild Animals Bhimashankar Sanctuary Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top