मूकबधीर मुलीचे अपहरण करुन, तिला दारु पाजुन लैंगिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Kidnaped girl and sexually abuse pune crime against two accused
मूकबधीर मुलीचे अपहरण करुन, तिला दारु पाजुन लैंगिक अत्याचार

मूकबधीर मुलीचे अपहरण करुन, तिला दारु पाजुन लैंगिक अत्याचार

पुणे : मूकबधीर मुलीचे अपहरण करुन तिला दारु पाजुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघढकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना 20 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दहा वर्षांच्या मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन राठोड नावाच्या व्यक्तीसह दोघांविरुद्ध अपहरण तसेच लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी परिसरामध्ये 20 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुकबधीर मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी राठोड नावाचा व्यक्ती व त्याच्या साथीदाराने तिचे अपहरण केले. मुलीला धमकावून निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांनी मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर त्यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या आइने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर दोघेजण तिला दुचाकीवरुन घेऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यानंतर मुलीच्या आईने तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर संशयित आरोपींनी मध्यरात्री मुलीला तिच्या घराजवळ सोडून ते पसार झाले. मुलीची झालेली अवस्था पाहून आईने तिला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीला दारु पाजुन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, मुलीने खाणाखुणांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: Crime News Kidnaped Girl And Sexually Abuse Pune Crime Against Two Accused

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top