प्रेमसंबंधातून जन्मलेले बाळ तरुणाने केले गायब

crime
crimesakal

अडीच वर्षानंतर तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर मित्रासह दोघांना अटक, बाळाचे काय केले, याबाबत चौकशी सुरु

पुणे : प्रेमसंबंधातून तरुणीने बाळाला जन्म दिला, त्यानंतर तिच्या मित्राने कुटुंबाच्या भितीपोटी बाळाला अनाथ आश्रमात ठेवण्याचा बहाणा करून पळवून नेले. तरुणीने अनेक दिवस विचारणा करुनही मित्राने बाळाची माहिती न दिल्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली, त्यानंतर पोलिसांनी मित्रासह दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.दरम्यान, पोलिसांकडून दोघांकडे बाळाचे नेमके काय केले, याबाबत चौकशी सुरु आहे.

शुभम महेश भांडे (वय.23, रा. वडगाव शेरी) व त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय.26,रा.मांजरी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी  शुभम भांडे दोघे एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे दोघांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. 2017 पासून दोघेही एकत्र राहत होते. त्यातून फिर्यादी तरुणी गर्भवती राहीली. तिने याबाबत शुभमला माहिती दिल्यानंतर त्याने "तू काळजी करु नको, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे" असे सांगितले. वैद्यकीय तपासणी करण्याच्यावेळी  शुभमने फिर्यादीसोबत पती म्हणून नाव लावले.14 मार्च 2019 मध्ये फिर्यादी तरुणीने ससून रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला.

रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर दोघे मुलाला घेऊन केशवनगर मुंढवा येथील घरी आले.  फिर्यादी तरुणीने शुभम याला याबाबत घरी सांगण्यास सांगितले, तेव्हा त्याने त्याच्या घरचे दोघांना स्विकारणार नाहीत असे सांगितले. त्यामुळे त्याने बाळाला जन्म आश्रमात ठेवतो असे सांगून फिर्यादीने विरोध केल्यानंतरही शुभम व त्याचा मित्र योगेश काळे या दोघांनी 27 मार्च 2019 रोजी सकाळी अकरा वाजता बाळाला नेले. काही वेळानंतर शुभम याने घरी येऊन बाळाला आश्रमात दिल्याचे सांगितले. त्यानंतर अनेकदा फिर्यादीने शुभमकडे बाळाची विचारणा केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.अखेर तिने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडे बाळाचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com