लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील तरुण ताब्यात, पुणे ATS ची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested by ats pune

पुणे एटीएसकडून उत्तरप्रदेश येथून इनामुल हक या तरुणास अटक करण्यात आली आहे.

लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील तरुण ताब्यात, पुणे ATS ची कारवाई

पुणे ग्रामीण भागातील अकरा तरूण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण पुणे भागात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागांतील काही भागांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता यानंतर आणखी एक बातमी समोर येत आहे. पुणे एटीएसकडून उत्तरप्रदेश येथून इनामुल हक या तरुणास अटक करण्यात आली आहे. (arrested by ats pune)

हेही वाचा: पुणे ग्रामीणमधून धक्कादायक बातमी, ११ तरूण बिश्नोई गँगच्या संपर्कात

मिळालेल्या महितीनुसार, इनामुल हक मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून तो जुनेद लष्कर-ए -तोयबाच्या संपर्कात होता. आता जुनैद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आधीही दोन आरोपींना एटीएसने अटक केली आहे. उत्तर प्रदेश येथील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, काही वेळात त्याला पुणे न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे. काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलढाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वीही अटक केली होती. काही तासांपूर्वी पुणे ग्रामीणमधून ११ तरूण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केलं असून वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अन्यथा..., महाजनांचा सल्ला

Web Title: Crime News Pune Inamul Haq In Uttar Pradesh Ats Arrested As Terrorist

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top