काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अन्यथा..., महाजनांचा सल्ला

भाजपचे उमेदवार धनजंय महाडिक यांना निवडून आणण्याच्या प्रक्रियेत आमदार महाजन अग्रस्थानी होते
girish mahajan
girish mahajanesakal
Summary

भाजपचे उमेदवार धनजंय महाडिक यांना निवडून आणण्याच्या प्रक्रियेत आमदार महाजन अग्रस्थानी होते

राज्यसभेत भाजपाने महाविकास आघाडीचा दारून पराभव केला आहे. यावेळीही तेच होईल, असे भाकित भाजपाच्या एका बड्या नेत्याने केले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (Legislative Council Election) आम्ही पाचवा उमेदवार निवडून आणणार आहे, त्यामुळे कॉंग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, असा थेट सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यसभेच्या गुलालानंतर आज ते जळगाव आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे तिसरे उमेदवार धनजंय महाडिक यांना निवडून आणण्याच्या प्रक्रियेत आमदार महाजन अग्रस्थानी असल्याचे दिसत होते. दरम्यान, आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी तयारीला वेग आला आहे. येत्या २० जूनला विधान परिेषदेसाठी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे.

girish mahajan
राष्ट्रपती निवडणूक - मोर्चेबांधणीला वेग, भाजपने 2 नेत्यांवर सोपवली जबाबदारी

यावेळी आमदार महाजन म्हणाले, विधानपरिषदेत पाचवा उमेदवार विजय करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. आमच्या उमेदवाराला लागणाऱ्या मतांचा कोटा आम्ही मिळवण्याची तजवीज केली आहे. त्यामुळे आमचा उमेदवार निवडूण येणारच याची आजच खात्री देत आहोत. आजच्या स्थितीत महाविकास आघाडीसोबत राहण्यास आमदार तयार नाहीत. काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन आमचा पाचवा उमेदवार विजयी करून ही निवडणूक बिनविरोध करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, या निवडणुकीत भाजपच्या चार जागा निश्‍चित असल्या तरी त्यांनी दोन अतिरिक्त उमेवार उभे केले आहेत. मात्र, एकाची माघार घेऊन पाचव्या जागेसाठी पक्ष मैदानात उतरणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रसेचे दोन उमेदवारांचा विजय निश्‍चित असले तरी कॉंग्रेसचा दुसरा उमेदवारासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. भाजपला पाचव्या उमेदवारासाठी थेट २७ मतांची गरज आहे.

girish mahajan
भाजप सहा जागा लढवण्यावर ठाम, सदाभाऊ पोहोचले फडणवीसांच्या भेटीला

दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते आमदारांना धाक दाखवत आणि धमक्या देत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. महाविकास आघाडीला आमदार वैतागले असल्याने ते आमच्या उमेदवाराला मतदान करतील, असा दावाही त्यांनी केला. विधानपरिषदेत तर गुप्तमतदान पध्दती आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचेही आमदार आमच्या उमेदवाराला मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com