दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा अल्पवयीन मुलाकडून खून

crime news
crime newsesakal

राजगुरूनगर : दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांचा, १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने खून केला. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील दावडी येथे ही घटना घडली. याबाबत खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावडी येथे राहणाऱ्या कुटुंबाचा, पशुपालन व दुग्ध व्यवसाय आहे. या कुटुंबातील वडिलांना दारूचे व्यसन होते. ते रोज दाऊ पिऊन १६ वर्षीय मुलाला शिवीगाळ व मारहाण करून, त्याच्याकडून काम करून घेत. मंगळवारी ते मुलाला दिवसभर शिवीगाळ व मारहाण करीत होते. त्याला दिवसभर जेवायलाही दिले नाही. तसेच रात्री अंथरूण पांघरून न देता, गोठयामध्ये झोपायला लावले. या सगळ्याचा मुलाला राग आल्याने, त्याने गोठयातील लोखंडी घण वडिलांच्या डोक्यात घातला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

crime news
धक्कादायक! भाजप नेत्याला गाडीच्या डिग्गीमध्ये जिवंत जाळलं

थोरल्या भावाने खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, खेड पोलिसांनी अल्पवयीन लहान भावाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com