
Crime News : पुणे मेट्रोच्या साहित्याची चोरी! दीड लाख किंमतीचे साहित्य लंपास
पुणे - बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरातून मेट्रो साहित्याची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या परिसरातून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News in Marathi)
हेही वाचा: Nana Patole : झाडे की आडबले? पाठिंबा देण्यावरून नाना पटोले- देशमुख आमने-सामने
रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी कंटेनरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख 42 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Sujay Vikhe Patil: कॉंग्रेस पक्षाबाबत सुजय विखे पाटलांचा मोठा दावा, म्हणाले....
मिळालेल्या माहितीनुसार, बंडगार्डन मेट्रो स्टेशन या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा करण्यात आला होता. चोरट्यांनी लोखंडी कंटेनर स्टोअरचे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे १६ लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरून नेलेला माल पोलिस शोध सुरू घेत आहेत.
हेही वाचा दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा