कॉंग्रेस पक्षाबाबत सुजय विखे पाटलांचा मोठा दावा, म्हणाले....Sujay Vikhe Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil: कॉंग्रेस पक्षाबाबत सुजय विखे पाटलांचा मोठा दावा, म्हणाले....

महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा काँग्रेसचे तब्बल 20 आमदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. अशातच आता भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कॉंग्रेस पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. (Sujay Vikhe Patil big claim about Congress party maharashtra politics )

माजी आमदार आशीष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. आशीष देशमुख यांच्या मागणीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटींचा निधी

दरम्यान, भविष्यात काँग्रेसमध्ये निश्चित मोठा भूकंप येईल असा दावा सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले विखे पाटील?

काँग्रेसमध्ये सध्या धुसपूस आहे. ती यापूर्वीदेखील होती. कारण ठराविक नेतेच फक्त मलाई खात होते आणि बाकीचे वंचित राहात होते. अनेक आमदारांची कामं होत नव्हती. बाकीच्या पक्षाचे सोडा, मात्र काँग्रेसचे मंत्रीच त्यांचे काम करत नव्हते.

Shivsena : एकीकडे PM मोदींच्या दौऱ्यावर कडाडून टीका अन् तिकडं 'सामना'त भाजपची पानभरून जाहिरात

खरं तर एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली हे एक निमित्त झालं. मात्र, ज्याप्रकारे शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुसपूस होती. त्याप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच “ही सुरूवात असून भविष्यात काँग्रेसमध्ये निश्चित मोठा भूकंप येईल. असं विखे पाटील म्हणाले

टॅग्स :Sujay Vikhe Patil