

Shikrapur police arrest young couple for allegedly murdering friend over suspicion of illicit relationship with wife
शिक्रापूर : नवीनच लग्न झालेल्या आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयाने एकाने आपल्या मित्राचा गळा आवळून खुन केला. अर्थात खुन केल्यानंतर मृतदेह कुठे टाकायचा म्हणून आपल्याच पत्नीची मदत घेवून शिक्रापूरातील करंजेनगर येथील मोकळ्या पटांगणावर टाकल्याने शिक्रापूरात एकच खळबळ उडाली असताना या खुनाचा तपास शिक्रापूर पोलिसांनी दोनच दिवसात लावून आरोपी मुकेश सोनवणे व जान्हवी पाटोळे या दांपत्याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.