CrimeSakal
पुणे
Pune Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाचा खून; आरोपीला अटक
नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अजय पंडित या तरुणाचा त्याच्याच चुलत भावाने खून केल्याचा प्रकार आला उघडकीस.
पुणे - नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अजय गणेश पंडित (वय-२२) या तरुणाचा त्याच्याच चुलत भावाने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अशोक कैलास पंडित (वय ३५, रा. मोशी, मूळ झारखंड) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
