लोहगाव येथील पाच अनधिकृत इमारती जमीनदोस्त

लोहगावात सर्वत्र अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. लोहगावचा विकास आराखडा मंजूर झाला नसल्याने सर्वच ठिकाणी बेसुमार बांधकामे सुरू आहेत.
Encroachment Crime
Encroachment CrimeSakal

विश्रांतवाडी - लोहगावमधील (Lohgaon) डी. वाय पाटील महाविद्यालय रस्त्यावरील स. न. ३०२, मोझेनगरमधील पाच अनधिकृत बांधकामावर (Illegal Construction) महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने हातोडा मारण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे (Crime) अनाधिकृत बांधकामे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

लोहगावात सर्वत्र अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. लोहगावचा विकास आराखडा मंजूर झाला नसल्याने सर्वच ठिकाणी बेसुमार बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना आवर घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने नोटिसा दिल्या जातात, मात्र नोटीसला न जुमानता नागरिक बांधकामे करत आहेत. आज महापालिकेच्या वतीने लोहगाव मधील स.न. 302, मोझे नगर मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सुरू असलेल्या बांधकामांना नोटिसा देऊन आज दिवसभर पाच इमारतींवर कारवाई करण्यात आली.

Encroachment Crime
पुणे : लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहीम ठप्प

जेसीबी व कटरच्या साहाय्याने बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता प्रदीप हरिदास, कनिष्ठ अभियंता नीळकंठ शिलवंत, दत्तात्रय चव्हाण, किरण कलशेट्टी, निखिल गुलेचा यांनी केली. दरम्यान, लोहगाव भागात यापुढे देखील अनधिकृत बांधकामावर सातत्याने कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी अनाधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महानगरपालिका बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com