esakal | विकलेल्या सदनिकांवर कर्ज काढून फसवणुक; गौतम पाषाणकरसह दोघांविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Pashankar

विकलेल्या सदनिकांवर कर्ज काढून फसवणुक; गौतम पाषाणकरसह दोघांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - बांधकाम प्रकल्पातील दोन सदनिका ग्राहकांना विकल्यानंतरही त्यावर पतसंस्थेतुन परस्पर दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक गौतम पाषाणकर यांच्याविरुद्ध चंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाषाणकर यांच्याविरुद्ध यापुर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गौतम विश्‍वानंद पाषाणकर (रा. सेनापती बापट रस्ता) व मंगेश अनंतराव गोळे (रा. हरीगंगा सोसायटी, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिपालसिंह विजयसिंह ठाकोर (वय 61, रा. वडनेर, मालेगाव, नाशिक) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: पुणे : 500 हून अधिक शेतकऱ्यांना 23 कोटीचा गंडा; एकास अटक

खराडी येथील यिनयांग प्रकल्पातील सी इमारतीमधील पी 101 व 102 या सदनिका परस्पर दुसऱ्यांना विक्री करून दोन कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाषाणकर यांच्यासह तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काही दिवसांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता पाषाणकर यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल झाला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाणकर व मंगेश गोळे हे "प्रॉक्‍सिमा क्रिएशन'चे भागीदार आहेत. त्यांच्या खराडी येथील "यिनयांग' या बांधकाम प्रकल्पातील सी इमारतीमध्ये फिर्यादी ठाकोर यांनी 902 हि सदनिका 1 कोटी 56 लाख 63 हजार 987 रुपयांना 2015 मध्ये खरेदी केली होती. याबाबतचा करारही करण्यात आला होता. मात्र, पाषाणकर व गोळे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सदनिकेचा ताबा दिला नाही. तसेच महिंदर परसराम मनसे (रा. गिता सोसायटी, कॅम्प) यांनी सी इमारतीमधील 802 क्रमांकाची सदनिका 81 लाख 90 हजार रुपयांना खरेदी केली होती. असे असतानाही त्यांनी संबंधीत सदनिकांवर सांगलीच्या व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेकडून 2 कोटी रुपये कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

loading image
go to top