esakal | बालेवाडी येथे अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर कारवाई I Encroachment
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachment Crime

बालेवाडी येथे अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी - येथे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन तीन विभागाकडून अनधिकृत पत्राशेडवर, तसेच बांधकामावर बालेवाडीत चार ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या वेळी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

बालेवाडी येथील साई चौक, दसरा चौक, स. नं. 44 आणि 45 येथे मोठया प्रमाणात अनधिकृत पत्राशेड, तसेच सिमेंट बांधकाम करून हार्ड वेअर, हॉटेल, चिकन सेंटर, भाजीची दुकाने, वॉशिंग सेंटर अशी दुकाने उभारण्यात आली होती. या ठिकाणी जागा मालकांना आधी नोटीस पाठवल्या असून ही शेड काढून न घेतल्यामुळे ही कारवाई केल्याचे बांधकाम विकास विभाग झोन तीन चे कनिष्ट अभियंता गंगाप्रसाद दंडिमे यांनी दिली.

हेही वाचा: शिरूर : कान्हूर मेसाईमध्ये तब्बल 103 दिवसांपासून शाळा सुरु

पोलीस बंदोबस्तात या सर्व पत्राशेड, व बांधकामवर जे. सि. बी. च्या सहाय्याने साधारण 12000 चौ. मी. क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी रस्त्यावर नागरिकानी कारवाई पहाण्यासाठी मोठी गर्दी केली. ही कारवाई बांधकाम विकास विभाग झोन तीन चे उपअभियंता जयवंत पवार, कनिष्ट अभियंता गंगाप्रसाद दंडीमे, कनिष्ट अभियंता संग्राम पाटील, कनिष्ट अभियंता संदेश कुलमूडे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.

loading image
go to top