

Loni Kalbhor Cops Prevent Violent Attack Arrest Three Youths
sakal
सुनील जगताप
थऊर : दि.०७:दुचाकीवर बसून घातपात करण्यासाठी चालेलेल्या तिघांचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उघळून लावत तिघांना धारदार कोयत्यांसह अटक केली आहे.ही कारवाई कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती परिसरात बुधवारी (ता.६)दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रकाश काळु कांबळे(वय २०,रा.फ्लॅट नं. ४०६.विघ्नहर्ता सोसा.जांभुळवाडी,कात्रज,पुणे ),मयुरेश्वर दत्तात्रय इटकर(वय १८,रा.टेकवडी, ता.पुरंदर,जि.पुणे), अक्षण रविंद्र चव्हाण(वय १८वर्षे,रा.फ्लॅट नं.६०३,विघ्नहर्ता सोसा. जांभुळवाडी,कात्रज,पुणे)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी गाडी व मोबाईल असा एक लाख सुमारे ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.