पुणे : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

शहरामध्ये घरफोड्याचे सत्र कायम असून शहराच्या वेगवेगळ्या भागात चार ते पाच घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घरफोडीच्या घटनांमध्ये नागरीकांचा तब्बल अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. घरफोडीच्या घटनेमध्ये कोंढव्यामध्ये सर्वाधिक पावणे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. 

पुणे : शहरामध्ये घरफोड्याचे सत्र कायम असून शहराच्या वेगवेगळ्या भागात चार ते पाच घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घरफोडीच्या घटनांमध्ये नागरीकांचा तब्बल अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. घरफोडीच्या घटनेमध्ये कोंढव्यामध्ये सर्वाधिक पावणे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोंढव्यातील घरफोडीप्रकरणी संदिप बधे (वय 49) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे कोंढव्यातील खडीमशीन जवळी बधे शाळेजवळ राहतात. बधे दोन दिवसांपुर्वी कामानिमित्त त्यांची सदनिका बंद करुन बाहेगावी गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेचे चोरट्यांनी कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील बेडरुममध्ये असलेल्या कपाटामधील 33 तोळे सोन्याचे दागिने व दिड किलो चांदीचे दागिने असा नऊ लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बधे शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता घरी आले. त्यावेळी त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरूवात केली आहे. 

आठवणी २०११ वर्ल्डकपच्या; सचिनसाठी संघाने गायलं होतं गाणं !

दरम्यान, कोंढव्यातीलच भाग्योदयनगर येथील अंबर सोसायटीमध्ये राहणाऱ्या अल्ताफ पठाण (वय 40) यांच्याही सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. पठाण हे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी एक तासामध्येच स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी बाजुला काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील 75 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.याप्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime Ratio in Pune are increase In Pune