चोरटयानी दुकानाची भिंत फोडून पळविले तब्बल 52 लाखाचे 307 मोबाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update pune Thieves broke shop wall and stolen 307 mobiles worth Rs 52 lakh

चोरटयानी दुकानाची भिंत फोडून पळविले तब्बल 52 लाखाचे 307 मोबाईल

पुणे : सोमवार पेठेतील एका मोबाईल दुकानाची थेट भिंत फोडून चोरटयांनी तब्बल 52 लाख 30 हजार रुपये किंमतीचे तब्बल 307 मोबाईल चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड़कीस आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोमवार पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सोमवार पेठेतील अपोलो चित्रपटगृह चौकाजवळच्या कुमार सधन नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये खुराना सेल्स मोबाइल शॉपी नावाचे दुकान आहे.

दुकानाचे मालक नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री साडे नउ वाजता दुकान बंद केले, शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता दुकान उघडले, तेव्हा दुकानामध्ये चोरी झाल्याचे उघड़किस आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णु ताम्हणे आदी घटनेच्या ठिकाणी आले. दुकानाच्या एका बाजूला जूना वाडा असून त्याबाजुने कोणी जात नसल्याचे पाहुन चोरटयानी भिंतीला भगदाड पाडुन दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील 52 लाख 30 हजार रुपये किंमतीचे तब्बल 307 मोबाईल चोरुन नेले. या प्रकरणाचा तपास समर्थ पोलिस करीत आहेत.

Web Title: Crime Update Pune Thieves Broke Shop Wall And Stolen 307 Mobiles Worth Rs 52 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top