एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update Threatening to throw acid on young woman one-sided love pune
एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करुन तिला चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. शिंदेवस्ती येथील कालव्यालगत २४ एप्रिल २०२२ रोजी हा प्रकार घडला.अभिजीत अशोक साबळे (वय-22, रा. शिंदेवस्ती, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तरुणीने फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी साबळे हा पीडित तरुणीला मागील काही महिन्यांपासून त्रास देत होता. आरोपी तरुणीचा पाठलाग करुन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या प्रेमाचा स्विकार कर’ असे म्हणून तिला धमकावत होता. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने तरुणीला पुन्हा अडवले. माझ्यासोबत बोलली नाही तर तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकीन अशी धमकी दिली. तसेच, तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण करीत आहेत.

Web Title: Crime Update Threatening To Throw Acid On Young Woman One Sided Love Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top