राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत मोठी वाढ; 'सीआयडी'च्या वार्षिक अहवालातून समोर आली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

'सीआयडी'च्या कार्यालयामध्ये 'सीआयडी'चे प्रमुख अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते गुरूवारी (ता.4) "महाराष्ट्रातील गुन्हे 2018" या अहवालाचे प्रकाशन झाले.

पुणे : राज्यातील महिलांवरील अत्याचारांचे सत्र थांबण्याची चिन्हे नसून अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. 2018 या वर्षी राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात 10.95 टक्के इतक्‍या प्रमाणात वाढ झाली आहे. तर राज्यातील एकूण गुन्ह्यात 19.87 टक्के इतकी वाढ झाली असल्याने अन्य राज्यांच्या तुलनेत देशपातळीवर राज्य सातव्या क्रमांकावर पोचले आहे, असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) 2018 या वर्षीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

पत्रकार रायकरांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी​

'सीआयडी'च्या कार्यालयामध्ये 'सीआयडी'चे प्रमुख अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते गुरूवारी (ता.4) "महाराष्ट्रातील गुन्हे 2018" या अहवालाचे प्रकाशन झाले. यावेळी पश्‍चिम विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलिस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर, पोलिस अधिक्षक प्रकाश गायकवाड यावेळी उपस्थित होते. 

अहवालानुसार, 2018 या वर्षी संपूर्ण देशात 31 लाख, 32 हजार 954 इतके गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी राज्यात तीन लाख 46 हजार 291 गुन्हे दाखल झाले आहेत. 2018 या वर्षी राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात 10.95 टक्के इतकी वाढ झाली असून सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. या गुन्ह्यांची संख्या सहा हजार 58 इतकी आहे. तर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची टक्केवारी अमरावती शहरामध्ये सर्वाधिक आहे.

तुम्हाला माहित आहे का? एकमेकांच्या संमतीने दररोज ५ जोडपी घेताहेत घटस्फोट!​

2017 च्या तुलनेत 2018 मध्ये राज्यातील अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांमध्ये देखील 13.36 टक्के इतकी वाढ झाल्याचे अहवालामध्ये नमूद केले आहे. देशात 2018 मध्ये दोन हजार 199 खूनाच्या घटना घडल्या असून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा 14 वा क्रमांक लागतो. देशात हुंडाबळीचे 200 गुन्हे दाखल असून गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणामध्ये राज्य 12 व्या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये देशात 21 हजार 42 गुन्हे दाखल असून बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता देशात राज्य 22 व्या क्रमांकावर आहे. 

भाडेकरुने घरमालकाकडे केली ५० लाखाच्या खंडणीची मागणी अन्...; वाचा पुढे काय झालं ते!​

* राज्यात घडलेल्या आत्महत्या - 17 हजार 972 
* रस्ते अपघातातील मृत्यू - 13 हजार 873 

2017 व 2018 मध्ये घडलेले गुन्हे :

गुन्हे 2017 2018 वाढ/घट 
खून 2103 2119 96 
दरोडा 643 769 126 
जबरी चोरी 6,451 7,430 979 
मालमत्तेचे गुन्हे 1,11,153 1,29,154 17,951
महिलांवरील अत्याचार 3,19,97 3,54,97 3500 
अनुसुचित जाती 1,689 1,974 285
अनुसुचित जमाती 464 526 62 
एकूण 2,88,879 3,46291 57, 412 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes against women increase by 10 percent in Maharashtra