भाडेकरुने घरमालकाकडे केली ५० लाखाच्या खंडणीची मागणी अन्...; वाचा पुढे काय झालं ते!

Crime
Crime
Updated on

पुणे : घरमालक आणि भाडेकरु यांची घरभाडे, देखभाल-दुरूस्ती, पार्कींग अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने संघर्ष होत असल्याची उदाहरणे आपण बघितली. मात्र, घरमालकाबरोबर पत्नीने अश्‍लिल चाळे केल्याची व्हिडीओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत भाडेकरुने घरमालकाकडूनच पाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार पहिल्यांदा उघडकीस आला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ आणि खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्या भाडेकरूला बेड्या ठोकत कायद्याची भाषा शिकविली आहे.

विश्रांतवाडीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या सात खोल्या असून त्या सर्व खोल्या त्याने भाडेकरुंना भाड्याने दिल्या आहेत. दरम्यान, त्यांच्याकडील एका भाडेकरुच्या पत्नीने घरमालक फिर्यादीला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. घरमालकाने तिला प्रतिसाद दिला. त्यानंतर मागील आठवड्यात संबंधीत महिलेने घरमालकाला तिच्या घरामध्ये बोलाविले. त्यानंतर तिने त्याच्याशी अश्‍लिल चाळे करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही दिवसातच महिलेच्या पतीने घरमालकाशी संपर्क साधला. त्याने घरमालकाला त्याच्या पत्नीशी अश्‍लिल चाळे करत असतानाची व्हिडीओ क्‍लिप दाखविली. तसेच संबंधीत प्रकरणी त्याची बदनामी करण्याची धमकी दिली. हे सर्व प्रकरण पुढे येऊ नये, यासाठी भाडेकरुने घरमालकास ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्याने घरमालकाकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. 

बदनामी होऊ नये, म्हणून घरमालकाने पाच लाख रुपये देऊन संबंधीत प्रकरण बंद करण्याची भाडेकरुला विनंती केली. ठरल्याप्रमाणे भाडेकरु घरमालकाकडून पाच लाख रुपये घेण्यासाठी पुणे स्टेशन येथे आला होता. दरम्यान, घरमालकाने याप्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणी विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून भाडेकरुला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले.

तर या गुन्ह्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे उघड झाले असून तिलाही ताब्यत घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस उपनिरीक्षक निलेश महाडीक, पोलिस कर्मचारी रमेश गरुड, सुनील चिखले, विजय गुरव, फिरोज बागवान, प्रदीप गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून 21 हजार रुपये, मेमरी कार्ड आणि मोबाईल जप्त केला. 

...म्हणून त्याने पत्नीशी संगनमत करुन केला ब्लॅकमेलिंगचा प्रकार 
भाडेकरुचे विश्रांतवाडी परिसरातच हॉटेल होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याचा हॉटेलचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. तर दुसरीकडे घरभाडे आणि अन्य खर्चही वाढत होते. या पार्श्‍वभूमीवर पैसे मिळविण्यासाठी भाडेकरुने पत्नीशी संगनमत करून घरमालकालाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने पत्नीला घरमालकाशी अश्‍लिल चाळे करण्यास सांगितले. त्याचा व्हिडीओ तयार करीत घरमालकाला ब्लॅकमेल करीत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune District
Green Signal for Massive Faculty Recruitment in Maharashtra Colleges
‘Accident Monday’ Turns Deadly; 14 Killed in Ambenali Ghat and Dhule Highway Mishaps
Fatal Accident: Senior MSEDCL Technician Electrocuted While Repairing High-Tension Wire in Giravali
Marathi News Esakal
www.esakal.com