क्वारंटाइन असताना फिरणाऱ्यांनो, आता तुमचे काही खरे नाही...

दत्ता म्हसकर
Tuesday, 28 April 2020

होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती मुक्तपणे संचार करीत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती मुक्तपणे संचार करीत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. संबंधित व्यक्ती फिरताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असून, त्यास सक्तीने विलगिकरण कक्षात दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार हनुमंत कोळेकर व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

जुन्नर तालुक्‍यात ओझर, लेण्याद्री व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे तीन विलगिकरण केंद्र तयार केली असून, त्यांची क्षमता 270 इतकी असल्याचे गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी सांगितले.

इंदापूरकरांनो सावधान, तालुक्यात कोरोनाचे आगमन

परगावाहून आलेल्या सुमारे 69 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, दोन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तालुक्‍यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्‍यात सोमवारी (ता. 27) एकाच दिवशी 106 जण आल्याचे आढळून आले आहे. सुमारे एक हजार जणांना होम क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत. 

संसर्ग होण्याची भीती 
होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीच्या हातावर मारलेले शिक्के पुसून जात आहेत. अशा व्यक्ती गावात व दुसऱ्या गावात देखील फिरत असल्याने कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांनी प्रशासनाचे नियम पळून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

होम क्वारंटाइन करूनही प्रशासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस विलगीकरण केंद्रात दाखल केल्यास त्याचा होणारा खर्च हा त्याच्याकडून अथवा कुटुंबाकडून वसूल करण्यात येईल. 
- विकास दांगट
गटविकास अधिकारी, जुन्नर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes will be registered against pedestrians during home quarantine