पुणे : आता गुन्ह्यांची झटपट उकल होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crimes will solved immediately Implement biometric identification system in state pune

पुणे : आता गुन्ह्यांची झटपट उकल होणार

पुणे : पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांवरून आरोपीची ओळख पटवली जायची. मात्र, आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा आणि छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा, तळहाताचे ठसे, चेहरा आणि डोळ्यांची बुबुळे डिजिटल स्वरुपात जतन करुन ते इतर छायाचित्रांशी जुळविण्याची क्षमता आहे. या यंत्रणेमुळे गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होणार आहे.

ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ (एएमबीआयएस) या संगणकीय प्रणालीचे उद॒घाटन गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते झाले. ‘एएमबीआयएस’ प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. पोलिस दलाने बोटांचे ठसेच नाही तर, तळवे, चेहरा आणि डोळे स्कॅन करुन डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होईल, असे रितेश कुमार यांनी सांगितले.

प्रास्ताविक पोलिस उपमहानिरिक्षक सुधीर हिरेमठ यांनी केले. या वेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंगुली मुद्रा विभागाचे वरिष्ठ तज्ज्ञ रोहोदार कासार, पोलिस निरीक्षक अविनाश सरवीर, पोलिस निरीक्षक रुपाली गायकवाड आदी उपस्थित होते.

अशी आहे ‘एएमबीआयएस’ प्रणाली

  • पोलिस ठाणे स्तरापर्यंत ‘एएमबीआयएस’ यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य

  • साडेसहा लाख आरोपीचा अभिलेख संगणकीकृत

  • ही प्रणाली सीसीटीएनएस, प्रिझम, सीसीटीव्ही आणि ‘एनएएफआयएस’ प्रणालीशी जोडणार

  • गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात वाढ होऊन दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होणार

  • गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार

  • प्रायोगिक परीक्षणात ५२ गुन्ह्यांत २.१४ कोटींच्या मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यात आरोपींचा छडा

Web Title: Crimes Will Solved Immediately Implement Biometric Identification System In State Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newspolicepunecrime
go to top