आळेफाटा : पिस्तूल व काडतूस विकायला आलेल्यांना पोलिसांनी केले जेरबंद

खाकी वर्दी चा हिसका दाखवल्या नंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
Arrested
ArrestedSakal

आळेफाटा (ता.जुन्नर) : परिसरात असणाऱ्या बस स्थानकाजवळ गावठी पिस्तूल विक्री होणार असल्याची गुप्त माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे (Alefata Police Station) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (PI Pramod Kshirsagar) यांना मिळाली. नंतर त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख उप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या आदेशानुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शना खाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, हवालदार विनोद गायकवाड, अमित माळुंज निखिल मुरमकर, मोहन आनंदगावकर यांच्या मदतीने सापळा रचून पंकज बाबाजी चाहेर(वय २२) आणि अमीर मोहम्मद शेख (वय २४) हे दोघेही राहणार रांधे अळकुटी पारनेर यांना ताब्यात (Arrest) घेतले. (Pune Crime News)

खाकी वर्दी चा हिसका दाखवल्या नंतर अजित पोपट आवारी राहणार रांधे पारनेर जिल्हा अहमदनगर व अनिल आवारी राहणार कामोठे मुबंई मूळगाव रांधे पारनेर यांनी गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी दिली असल्याची कबुली दिली आहे. अजित आवारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अनिल आवारी याचा पोलीस शोध घेत आहे.

Arrested
आयफोन बंद पडल्याने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी : ग्राहक आयोग

या घटनेचा पुढील तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, अमित मालुंजे, निखिल मुरूमकर, मोहन आनंदगावकर आदींचा समावेश होता. पोलिसांनी संशयित आरोपींकडून गावठी कट्टा हस्तगत केल्याने आळेफाटा पोलिसांची मान उंचावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com