आयफोन बंद पडल्याने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी : ग्राहक आयोग | Consumer Commission | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Iphone

आयफोन बंद पडल्याने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी : ग्राहक आयोग

पुणे : सॅनिटायझरने स्वच्छ केल्यानंतर बंद झालेला आयफोन (iPhone) बदलून देण्यास कंपनीने नकार दिल्याने ग्राहक आयोगात (Consumer Commission) तक्रार दाखल केलेल्या ग्राहकास आयोगाने दिलासा दिला आहे. ॲपल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (Apple India PVT Ltd) ग्राहकास मोबाईलचे ८० हजार रुपये नऊ टक्के व्याजाने परत करावे, असा आदेश आयोगाने दिला आहे.

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितीजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. खराडी येथे राहणारे उपेंद्र सरवैया यांनी याबाबत आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी आयफोन कंपनीचा एक्स एस फोन ८० हजार रुपयांना खरेदी केला होता. तो फोन पाणी प्रतिविरोधी असल्याची जाहिरात कंपनीकडून करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात तक्रारदार यांनी फोन सॅनिटायझरने स्वच्छ केला. त्यामुळे तो बंद झाला होता.

हेही वाचा: इथे ओमिक्राॅन नाही का? मास्क कोण घालणार : एकनाथ शिंदे

त्यामुळे त्यांनी तो कंपनीच्या अधिकृत दुरुस्ती केंद्रात नेला. मोबार्इलमध्ये लिक्विड कॉन्टॅक इंडिकेटर (एलसीआय -पाण्याचे संपर्कात येणे) दोष असून हा भाग नुकसान भरपार्इच्या कालावधीमधील दुरुस्ती अंतर्गत येत नाही. त्याच्या दुरुस्तीसाठी ६० हजार रुपये खर्च येर्इल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तक्रारदार यांनी आयोगात तक्रार दाखल करीत १० टक्के व्याजासह ८० हजार रुपयांची नुकसान भरपाई, मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये आणि तक्रारखर्च म्हणून १० हजार रुपये मिळण्याची मागणी केली.

पंबाज राज्य आयोगाने ॲपल इंडिया प्रा. लि. विरुद्ध तरुणकुमार प्रथम अपील या तक्रारीत नमूद केलेल्या न्यायतत्वानुसार तज्ज्ञ अहवालाशिवाय सदोष फोन दुरुस्त अथवा बदलून देणे कंपनीवर बंधनकारक आहे, असा निकाल देण्यात आला होता. त्याचा संदर्भ या निकालात देण्यात आला आहे. कंपनीने तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटी व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून २० हजार रुपये द्यावे, असे आदेशात नमूद आहे.

हेही वाचा: इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये सहा दरोडेखोरांचा धुमाकूळ

कंपनीने दुरुस्तीची अट पाळली नाही :

पाणी प्रतिविरोधी वर्गवारीतील मोबार्इलचे संपूर्ण दोष दुरुस्त करून देण्याची अट कंपनीने पाळली नाही. तक्रारदार यांच्या मोबाइलमध्ये असलेले दोष हमी कालावधीमधील अटी व शर्तीप्रमाणे करून देणे आवश्‍यक होते. तक्रारदरांनी निष्काळजीपणे फोन वापरल्याची बाब दुरुस्ती पत्रकामध्ये कोठेही नमूद नाही, असे आयोगाने दिलेल्या आदेशात नमूद आहे.

टॅग्स :Pune Newsiphone