शिरूर : रांजणगाव एमआयडीसी व परिसरातील गावांत बोकाळलेल्या गुन्हेगारीविरूद्ध, पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला असून, आज सोनेसांगवी या छोट्या गावांतील गस्तीदरम्यान एका बंदूकधारी तरूणाला जेरबंद केले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल चार गावठी पिस्तूल, बारा जीवंत काडतूस, तीन मॅग्झीन असा सुमारे एक लाख ८२ हजार रूपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त केला.