
पुणे - कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या आणि वारंवार गुन्हे करणाऱ्यांची आता खैर नाही. पोलिसांनी मागील पाच वर्षांतील गंभीर गुन्ह्यांतील सुमारे ३० हजारांहून अधिक गुन्हेगारांची नावे, पत्त्यासह कुंडलीच तयार केली आहे. या ‘मायसेफ डेटाबेस ॲप’च्या माध्यमातून गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची सराईत गुन्हेगारांवर करडी नजर राहणार आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.