अल्पवयीन मुलांकडून साडेसात किलो गांजा जप्त; विश्रांतवाडीत रस्त्यावर करत होते विक्री

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

अमली पदार्थ विरोधी पथक (पूर्व) (Anti Drug Squad) विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

पुणे : सराईत गुन्हेगार दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने विश्रांतवाडीतील (Vishrantwadi) रस्त्यावर खुलेआम गांजाची विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत माहिती मिळताच दोन अल्पवयीन मुलांना आणि एका तरुणास अमली पदार्थ विरोधी पथकाने (पूर्व) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा सात किलो ३६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.७) ही कारवाई करण्यात आली. 

खड्डे आणि चिखलमय रस्त्यामुळे उरुळीकर त्रस्‍त; जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास​

रोहीत नानाभाऊ लंके (वय २१, रा. कस्तुरबा हौसींग सोसायटी, विश्रांतवाडी) याला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथक (पूर्व) (Anti Drug Squad) विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कस्तुरबा सोसायटी, अनिरुद्ध अपार्टमेंट समोरील रस्त्यावर काही युवक गांजाची विक्री करीत आहेत, अशी माहिती पथकातील पोलिस शिपाई सचिन चंदन यांना मिळाली.

आता समुद्रातून मिळणार पिण्यायोग्य पाणी अन् वीज; आयसरच्या शास्त्रज्ञांनी केलं संशोधन​

त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अर्जुन दिवेकर, शिवाजी राहिगुडे, प्रशांत बोमादंडी, मीना पिंजन, अमित छडीदार, सचिन चंदन, मनोज साळुंखे आणि योगेश मोहिते आदींच्या पथकाने घटनास्थळी जाऊन लंके आणि त्याचे दोन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ७४ हजार २०० रुपये किंमतीचा सात किलो ३६० ग्रॅम गांजा जप्त केला. 

पुढील कारवाईसाठी तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीसह जप्त मुद्देमाल विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. लंके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal selling marijuana openly in Vishrantwadi with the help of two minors